Ad will apear here
Next
‘विवेकानंद’मध्ये ‘जीएसटी’वरील कार्यशाळा
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत ‘भारतातील कररचना व जीएसटी’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी भारतातील कररचनेचा उगम, विकास व कार रचनेसंदर्भातील राज्य व केंद्र सरकारचे वित्तीय धोरण व जीएसटी. याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर हे होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. होनगेकर म्हणाले, ‘जीएसटी ही नवीन करप्रणाली सर्वांना समजली पाहिजे, भारतीय अर्थव्यवस्थेत, व्यापार क्षेत्रात जीएसटीचे फायदे तोटेही सर्व विद्यार्थ्यांना कळाले पाहिजेत. यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक प्रा. वाय. डी. हस्ताळे यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. एस. जी. गावडे यांनी केले. आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले. या वेळी शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी डॉ. एम. व्ही. चरणकर, प्रा. एस. एम. जोशी, डॉ. एम. एस. घोरपडे, प्रा. समिक्षा फराकटे, प्रा. एस. एम. रुईकर, प्रा. बी. के. गोसावी व प्रशासकीय स्टाफ, विद्यार्थी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZZCBG
Similar Posts
‘शिक्षक समाज आणि संस्कृतीचे पालकत्व स्वीकारतो’ कोल्हापूर : ‘अत्यंत त्यागमय भावनेने कष्टाळू वृत्तीने विद्यार्थी घडवणारा शिक्षक समाज घडवत असतो. आज शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे आणि शिक्षकाच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. शिक्षण संस्था व्यावसायिक झाल्या आहेत आणि शिक्षकाच्या व्रतस्थपणाचेदेखील व्यावसायिक पेशात रूपांतर झाले आहे. या शिक्षण व्यवस्थेतील खरा
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या
विवेकानंद महाविद्यालय दुसऱ्यांदा ठरले 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' कोल्हापूर : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातील एक गुणवत्ताप्राप्त व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणारे महाविद्यालय आहे. नुकताच या महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' हा दर्जा दिला असून या वर्षी महाविद्यालयाला एक कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे
'समाजाच्या जडणघडणीत संतसाहित्याचे योगदान मोठे’ कोल्हापूर : ‘संत हे सर्वश्रेष्ठ युगपुरुष होते. संतविचारांचा, त्यांच्या कार्याचा व साहित्याचा प्रभाव समाजमनावर आहे. समाजाच्या जडणघडणीत संतसाहित्याचे योगदान मोठे आहे,’ असे विचार पुणे येथील संत सेवा संघाच्या विश्वस्त स्वर्णिमा बाठे यांनी मांडले. विवेकानंद कॉलेज येथील वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ‘संतसाहित्याचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language